Hero Image

'आई बाबांचं घर' हे काय आहे ?

Ajay Purkar

'आई बाबांचं घर' हे अजय पुरकर ह्यांनी बांधलेले एक सुंदर घर आहे. हे घर आंबा घाट येथे बांधले आहे. हा प्रांत अजय ह्यांच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. हा प्रदेश नैसर्गिक रित्या सुंदर तर आहेच पण त्या बरोबर ऐतिहासिक दृष्ट्या तेवढाच महत्वाचा आहे. अजय पुरकर ह्यांनी पावनखिंड सिनेमा मध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांची भूमिका साकारली होती ज्याच्या मुळे त्यांच्या मनात ह्या प्रदेशा बाबत प्रेम आणि मान हा द्विगुणित झाला आहे. त्यांनी बांधलेले हे घर ते आता सर्वां करिता खुले करत आहेत. जे इच्छुक आहेत ते आता ऑनलाईन बुकिंग करून ह्या घरी राहायला येऊ शकतात आणि हे सुंदर असे घर, हा सुंदर प्रदेश आणि इथला भव्य दिव्य इतिहास हा अनुभवू शकता.

घराची झलक

हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत

प्रशस्तिपत्र

Testimonial 1 Testimonial 2

"अंबा मधले आई बाबांचे घर आमचे मित्र श्री अजय पुरकर यांनी अंबा घाटाच्या अलीकडे अतिशय सुरेख असे घर बांधले आहे ' आई बाबांचे घर

पावनखिंड सिनेमा बघितला तेव्हा पासून बाजी प्रभू देशपांडे ना जिथे वीर मरण आले त्या घोड खिंडीस भेट द्यायची इच्छा होतीच आणि त्यातच सिनेमा मध्ये खुद्द बाजींचे काम साकारलेल्या अजय चे पावनखिंड च्या अगदी जवळ असलेलं आई बाबांचे घर मध्ये दोन दिवस राहायचे हा दुग्ध शर्करा योग जुळून आला . कोल्हापूरहून सकाळी अंबा ला यायला निघालो. वाटेत पावनखिंडला भेट देऊन पुढे अंब्यात यायचे ठरवले. पावनखिंड ला भेट दिल्यावर तेथे अक्षरशः भारावून जायला होते. सर्व शिडी वगैरे ची सोय असून सुद्धा खिंडीत उतरताना मनात भीती वाटत होती तर त्या काळी महाराज आणि मावळे कसे काय इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लढले असतील याचा विचार केला तरी अंगावर रोमांच उभे राहतात. तिथे खिंडीत उभे राहून तिथल्या लढाईचे वर्णन ऐकले की आपण किती खुजे आहोत याची जाणीव होते. बाजीप्रभू असंख्य मावळे आणि महाराजांपुढे नतमस्तक होऊन आम्ही अंब्याच्या दिशेने निघालो

अंबा गावातून थोडे घाटाच्या दिशेने पुढे आलो की आई बाबांचे घर च्या पाटी ने आमचे स्वागत केले . आम्ही येणार हे माहीत असल्याने सुंदर बन चे व्यवस्थापक श्री महादेव बोने उर्फ महादू मामा आमची वाट पाहत उभेच होते. हायवे ला सुंदरबन कॉलनी आहे तेथेच हे अजय ने अतिशय सुरेख असे घर बांधले आहे. कॉलनी मध्ये प्रवेश करून साधारण एक दीड किलोमीटर आत अंतर पार करून आम्ही घरी आलो. दोन बेडरूम हॉल आणि किचन आणि बाहेर प्रशस्त अशी जागा असे अत्यंत देखणे घर समोर आले. निसर्गाच्या कुशीत हे वर्णन यथार्थ ठरेल असे घर आहे .सर्व सोयी सुद्धा छान केल्या आहेत. घराच्या मागच्या बाजुला दाट जंगल आणि नीरव शांतता हे अनुभवायास मिळाले . शहरातील गडबड गोंगाट पासून दूर जायचे असेल तर आई बाबांचे घर हा परफेक्ट गेटवे आहे. संध्याकाळी व्हरांडा मध्ये बसलेले असताना गौर ( गवे) चे दर्शन तर घराच्या दारात झाले. रात्री शांततेचा अनुभव घेत असताना अचानक झाडामध्ये लायटिंग चालू झाले . काजव्यानी आपली करामत दाखवायला सुरुवात केली होती. वरती निरभ्र आकाश बाजूला शांत जंगल त्यामध्ये चमचमणारे काजवे अनुभवत किती वेळ अबोल बसून होतो ते कळलेच नाही

महादू मामांकडचे सुग्रास जेवण सकाळी विनोद ने करून दिलेला आयता वाफाळता गरम चहा अहाहा नुसते सुख जवळपास फिरून मानोली चे धरण,sunset point , देवराई मधील अंबेश्वर हे ग्राम दैवताचे मंदिर ही ठिकाणे सुद्धा पाहता आली. या घरात टीव्ही नसणे हे सुद्धा एक प्रकारे सुखाचेच आहे . कारण टीव्ही आला की बाहेरची ही मजा अनुभवता च येत नाही . उन्हाळा असून सुद्धा एवढे आल्हाददायक तर पावसाळा थंडीत तर विचारायलाच नको. पुन्हा दिवाळी नंतर येऊन त्या वेळचे वातावरण अनुभवावे असे ठरवले आहे. 5 जून ला जागतिक पर्यावरण दिन असतो त्याच दिवशी आम्हाला निसर्गात रहायला मिळाले हा अजून एक अमृत शर्करा योग अजय ने शंकरा ( आई बाबांचे घर) सर्वांसाठी खुले केले आहे नक्कीच प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावाच असे ठिकाण आहे "


- Mr Jagdish and Mrs Anita Ranade

आमच्या गेस्ट चे फोटो

घर आतून कसे आहे

येथे तुम्ही देखील येऊन राहू शकता !!

  • निसर्गाच्या कुशीत राहायची सोय
  • तुमच्या घरापासून परत तुमच्या घरापर्यंत आणायची आणि पोचवायची सोया (स-शुल्क)
  • चविष्ट जेवण (शाकाहारी / मांसाहारी)
  • जवळ असलेल्या पर्यटन स्थळांची भ्रमंती

Cancellation / Refund Policy

Cancellation of bookings can happen 24 hours before the booking date. Refunds shall be processed as follows:

  • 1 week before booking date - 75% booking amount refunded
  • 2 days before booking date - 40% booking amount refunded
  • 1 day before booking date - No amount refunded

How to reach?

Address: SHANKARA Sunderban Colony, Ratnagiri - Kolhapur Highway, lGat No.131 B/29, Plot No. 18, AT & Post : Amba, Tal. Shauwadi, Dist. Kolhapur Pin 415101

Contact us (office address)

Address

1, Deeprekha, housing society, dashabhuja ganpati road, tulshibaugvale colony, plot no. 1, Parvati, Pune 411009

Phone No.

+917820991120

Email Address

contact.aaibabanchaghar@gmail.com